Breaking News

लोणंद परिसरातील सहा जण तडिपार


लोणंद / प्रतिनिधी : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, दरोडा, व मारामारी यासारखे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत निर्माण करणार्‍या सहा जणांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर समाजात शांतता रहावी यासाठी लोणंद पोलीसांनी दाखल केलेला तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यानुसार संबंधित सहाही जणांना एक वर्षाकरीता सातारा जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे.

जिल्हयातून तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये निलेश किसन गोवेकर (रा. कोरेगाव ता. फलटण), अमोल उर्फ नाना ढोणे (रा. डोंबाळवाडी ता. फलटण), सोनेश अरुण जाडकर (रा. साखरवाडी), राकेश रमेश निंभोरे (रा. साखरवाडी), माऊली दिलीप जाधव (रा. तरडगाव) , वैभव हणमंत चव्हाण (रा. खामगाव) यांचा समावेश आहे.

लोणंद पोलीस स्टेशनमध्ये वरील सहा जणांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. सपोनि गिरिश दिघावकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर परिसरात शांतता रहावी म्हणून त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी चौकशी केल्यावर संबंधित संशयितांना पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी त्या सहाही जणांना एक वर्षाकरीता सातारा जिल्हयातून तडीपार केले.

या कारवाईमध्ये सपोनि गिरिश दिघावकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश पवार, सहाय्यक फौजदार यशवंत महामुलकर , नाईक श्री. वाघमारे, श्री. साबळे, श्री. गायकवाड, श्री. शिंदे यांनी सहभाग घेतला.