Breaking News

म्हसवडला तिथीनुसार शिवजयंती उत्साहात


म्हसवड / प्रतिनिधी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सुशोभित करुन तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीनिमित्त सकाळी 10 वाजता सिध्दनाथ मंदिराचे सालकरी दीपक गुरव, सिध्दनाथ गुरव व मठाधिपती रविनाथ महाराज यांच्या हस्ते शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला यावेळी माण तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. पूनम माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. 

यावेळी उपतालुका प्रमुख अंकुश नलवडे, ऍड. महादेव डोंबे, ऍड. अभिजीत केसकर, राहुल म्हेत्रे, समीर जाधव, गोपिनाथ देवकर, बी एम अबदागिरे, महादेव कवी, मुसा तांबोळी, जहांगिर नदाफ, सदाआनंद राजमाने, अजित तिवाटणे, भरत दोशी, चंद्रकात स्वामी, प्रशांत दोशी, राकेश दोशी, जितेंद्र गांधी, धोंडीराम साळुंखे, हनिफ मुल्ला, डॉ राजेश शहा, डॉ राजेंद्र मोडासे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले
यावेळी हि जयंती पार पाडण्यासाठी म्हसवड शहरप्रमुख राहुल मंगरूळे, विभाग प्रमुख शिवदास केवटे, सोमनाथ कवी, आनंद बाबर, सचिन भोकरे, अदित्य सराटे, प्रितम तिवाटणे, अंबादास शिंदे, व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी म्हसवड शहरातील नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.