Breaking News

विकासाची गंगा अखंडपणे सुरू ठेवणार : आ. जयकुमार गोरे


कातरखटाव प्रतिनिधी : उरमोडी धरणात जमीन गेल्याने खटाव तालुक्यात पुनर्वसन झालेल्या पोपळकरवाडी च्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले असून यापुढील काळात ही विकासाची गंगा अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

पोपळकरवाडी ( ता. खटाव ) येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, धैर्यशील कदम, भरत जाधव, विशाल बागल, ज्येष्ठ नेते धोंडीराम बापू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. गोरे म्हणाले की, पोपळकरवाडीच्या ग्रामस्थांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी म्हणून चौदा वर्षे संघर्ष करावा लागला. धोंडीराम पोपळकर , सत्यवान वाघ व ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केल्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळा कडे पाठपुरावा करून ग्राम पंचायत कार्यालय, गटार बांधकाम, समाज मंदीर, एस. टी. पिक अप शेड, पाण्याचा हौद यासाठी सुमारे चाळीस लाख रूपयांची कामे मंजूर करून आणण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला. यापुढे ही विकास कामे अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून ग्रामस्थांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन केले.

यावेळी भगवान पवार, श्रीरंग भिसे, अरूण देवरे, सोनाबाई पोपळकर, लक्षमी पोपळकर, रंजना वाघ, कृष्णा कुडवे, लक्ष्मण मोहिते, लक्ष्मण पोपळकर , मारूती वाघ, गणेश पोपळकर, युवराज पोपळकर, सत्यवान वाघ आदीसह वायूसूत विकास मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसरपंच धोंडीराम पोपळकर यांनी प्रस्ताविक व स्वागत केले.तर नवनाथ पोपळकर यांनी आभार मानले.