Breaking News

प्रशांत आरंगळे यांची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड

Image result for पोलिस

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

तालुक्यातील कणगर येथील आरंगळे वस्ती येथील प्रशांत शिवाजी आरंगळे यांची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाली.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.यात त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

प्रशांत आरंगळे यांचे प्राथमिक शिक्षण गणेगाव येथे तर माध्यमिक शिक्षण राहुरी फॅक्टरी येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे एका कंपनीतनोकरी करत असताना सन २०१४ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती . संख्येश्वर पतसंसंस्थेतील अधिकारी शिवाजी आरंगळे यांचे ते चिरंजीव आहेत.