Breaking News

फसवणूकप्रकरणी दिल्ली येथील तिघांना अटक; कराड तालुका पोलिसांची कारवाई


कराड / प्रतिनिधी - मलकापूर (ता. कराड) येथील एकास दिल्लीतील तिघांनी पॉलिसीचे पैसे व विमा करून देतो, असे सांगून सुमारे 14 लाखांना गंडा घातला होता. याबाबतची फिर्याद संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, रा. आगाशिवनगर मलकापूर, ता. कराड) यांनी पोलिसात दिली होती. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी दिल्ली येथून तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रदिपकुमार उर्फ विर सिंह (वय 24 रा. शुकरपूर सरस्वती विहार नॉर्थ वेस्ट दिल्ली, सध्या रा. बिकानेर बेकरी मागे राणी बाग नवी दिल्ली), अक्षय कुमार उर्फ सुनिल कुमार (वय 24 रा. किराडी सुलेमान नगर दिल्ली), सिकंदर सिंह सिरोहा उर्फ लाल सिंह सिरोहा (वय 24 रा. किराडी सुलेमान नगर नॉर्थ वेस्ट दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी दाभोळे यांच्याशी प्रदिपकुमार सिंह, अक्षय कुमार, सिकंदर सिंह सिरोहा या तिघांनी फोनवरून संपर्क साधून तुमचे पुर्वीची टाटा एआयजी कंपनीची पॉलिसीचे पैसे व विमा करून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यावर पैसे भरायला लावून सुमारे 14 लाख 24 हजार 274 रूपयास गंडा घालून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन तपास करून शिताफीने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.