Breaking News

शिवरायांच्या पुतळा परिसरातील दुरवस्था दूर करण्याची मागणी


अहमदनगर / प्रतिनिधी : येथील बसस्थानक परिसरातील चौकात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याची 9 वर्षांपासून ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य जलाभिषेक करून पूजा केली जाते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पुतळ्यानजीक असलेल्या हौदात पाणी उपलब्ध होत नसून टाकीही अस्वच्छ झालेली आहे. तसेच परिसरातील विद्युत रोषणाईही बंद झालेली असून कारंजाही बंद अवस्थेत आहे, परिसरातील ही दूरवस्था दूर करण्याची मागणी ‘शिवप्रतिष्ठान’च्या वतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. परिसरातील दूरवस्थेत सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवीदास मुदगल, राहुल म्हसे, शिवाजी वराडे, सागर सातपुते, अशोक मांढरे, दिनेश शिरसाठ, विनोद काशीद, भूषण झारखंडे, तानाजी देवकर, तुषार मुळे, नीलेश चव्हाण आदींनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे.