Breaking News

मसूरच्या उपसरपंचपदी विजयसिंह जगदाळे बिनविरोध


सरपंचपदाचा कार्यभार पंकज दीक्षित यांनी स्वीकारला
मसूर /प्रतिनिधी : येथील ग्रामपंचायतीच्या पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून पंकज बाळकृष्ण दीक्षित यांनी आज पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी युवा नेते विजयसिंह मानसिंगराव जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. जनतेने विश्र्वासाने टाकलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन बिनतक्रार पार पाडीत पारदर्शक कारभारातून सर्व पुढे आदर्श ठेवून मसूरचा नावलौकिक वाढवण्याची ग्वाही यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच यांनी दिली.आज सकाळी लोकनियुक्त सरपंच पंकज दीक्षित यांनी नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला. दुपारी त्यांच्याच अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी विजयसिंह जगदाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, सहाय्यक निवडणूक अधिकारी एस. एल. गोखले यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, मंडलाधिकारी राम गुरव, तलाठी मृदुला कुलकर्णी, विस्ताराधिकारी आर. के. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित सदस्य रमेश जाधव, संजय शिरतोडे, प्रमोद चव्हाण, कैलास कांबळे, सुनिल जगदाळे, अक्षय कोरे, कौशल्य पाटोळे, पूजा साळुंखे, कांचन पारवे, शुभांगी जगदाळे, वैशाली पाटोळे, रुपाली गरवारे, सुनिता मसुरकर, अलका यादव, नीलोफर मोमिन उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. रणजीतसिंह जगदाळे यांनी केले आभार रमेश चव्हाण यांनी मानले.