Breaking News

सेवापूर्तीनंतरही ‘दान’ देऊन प्राध्यापकांनी आदर्श निर्माण केला - थोरात


संगमनेर/प्रतिनिधी: ज्या संस्थेत निष्ठेने वर्षानुवर्षे ज्ञानदान केले त्या संस्थेसाठी सेवापूर्ती नंतरही योगदान देण्याची उर्मी कायम ठेवून भरीव रक्कम दान करणारे प्राध्यापक खरोखरनव्या पिढीच्या समोर आदर्श निर्माण करणारे आहेत. संगमनेरच्या शैक्षणिक वाटचालीतील हा ऐतिहासिक क्षण आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

आपल्या अर्जित रजेची लक्षावधी रुपयांची रक्कम शिक्षण प्रसारक संस्थेवरील प्रेमापोटी संस्थेला दान देणार्‍या २८ प्राध्यापकांना आमदार थोरात यांच्या हस्तेदधिची सन्मान प्रदान करण्यात आला, याप्रसंगी बोलताना थोरात यांनी वरील भावना व्यक्त केली. साईबाबा सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावरआमदार डॉ.सुधीर तांबे, शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, खजिनदार राजकुमार गांधी, सचिव डॉ.अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री तसेच सर्व गौरवमूर्ती प्राध्यापक उपस्थित होते.

संस्थेसाठी निरपेक्ष भावनेने दान देणार्‍या प्राध्यापकांना दधिची ऋषी इतकी चपखल आणि सुंदर उपमा दुसरी असू शकत नाही. राज्यात संगमनेरचा मानबिंदूम्हणून ओळख असलेल्या संगमनेर महाविद्यालायातील हा सन्मान सोहळा म्हणजे स्फूर्ती देणारा कार्यक्रम ठरला आहे अशा शब्दात आमदार डॉ.तांबे यांनीआपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.मालपाणी यांनी प्राध्यापकांनी दिलेल्या दानामुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्या दानाचे मोल होऊ शकत नसल्याचीभावना व्यक्त केली. त्यांनी दिलेल्या या सात्विक दानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची गंगोत्री ठरलेले हे महाविद्यालय नव्या उमेदीने भविष्याकडे झेपघेण्यास सिध्द झाले आहे.असे मालपाणी म्हणाले.

दानदात्या प्राध्यापकांवर डॉ.मालपाणी यांनी लिहिलेल्या ‘मी पाहिला दधिची’ या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच सर्व प्राध्यापकांना मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, पगडीप्रदान करून आमदार थोरात व आमदार डॉ.तांबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.