Breaking News

नामजप कलियुगातील उद्धाराचे साधन-हभप देवकर


अहंमदनगर/प्रतिनिधी: कलियुआगमध्ये ईश्वर प्राप्तीसाठी कर्मकांड करण्याची गरज नाही. तीर्थक्षेत्रांच्या भेटीस जाण्याची आवश्यकता नाही. संतांनी सांगितल्यानुसार भगवंतांच्या नामजपाने ईश्वर प्राप्ती होते. नामजप हाच कलियुगातील उध्दाराचा मार्ग आहे असे प्रतिपादन हभप पंढरीनाथ महाराज देवकर यांनी केले. अंतरावालीबुद्रुक येथील आयोजित सप्ताहामध्ये ते बोलत होते.

 यावेळी हभप.परशुराम दळवी,हभप सुदर्शन ठोंबरे, हभप रामशास्त्री नागवडे व भावीक उपस्थित होते. गावातील ग्रामस्थ व युवक तरुणांनी एकत्रित येऊन या सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहादरम्यान प्रवचन,कीर्तन,पारायण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.