Breaking News

रविदास महाराजांच्या जयंती निमित्त पुरस्काराचे वितरणपाथर्डी/प्रतिनिधी
चर्मकार विकास संघ व संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्यावतीने दिले जाणारे श्री संत रविदास समता भूषण पुरस्कार जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजयमाला माने, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे, प्रा. पुष्पलता मरकड व आर्किटेक्ट कल्याण सोनावणे यांना आ.शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संत रविदास महाराजांच्या जयंती निमित्त पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरुवार दि. 14 मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमास प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्ता तनपुरे, संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भारत कांबळे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, कानिफनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ, वृद्धेश्‍वर सहकार साखर कारखान्यायाचे संचालक चारुदत्त वाघ, आडगावचे सरपंच जिजाबा लोंढे, उपसरपंच दुर्योधन लोंढे, चैतन्य ट्रॅव्हल्सचे संचालक किशोर मरकड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.