Breaking News

कार व मोटरसायकलच्या अपघातात दोन ठार


पारनेर/प्रतिनिधी: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा येथे कार व मोटरसायकलच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

याबाबत सुपा पोलिस स्टेशन वरून मिळालेली माहिती अशी की, सुपा पोलिस स्टेशन हद्दीत नगर-पुणे रोडवर भारत पेट्रोल पंपाच्या समोर म्हसने फाट्या जवळ मोटरसायकल हिरो होंडा एम एच-16-ए-3619 आणि मारुती स्विफ्ट गाडी एम एच-23-वाय-1552 याच्यात समोरासमोर अपघात होऊन मोटोरसायकल वरील माणिक नामदेव पठारे (वय 50) रा.म्हसने व रामा पार्वती आराखडे (वय 58) रा. बाबुर्डी पारनेर हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात रात्री 8.10 च्या सुमारास झाला. अपघाताबाबत कार चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालूू होते.दोघांना सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत दोघांना शवविच्छेदनासाठी पारनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक संजय कुमार सोने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी कडूस हे करत आहेत.