Breaking News

अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना 'अमृत मेरिटोरियस' शिष्यवृत्ती


संगमनेर/प्रतिनिधी

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असणार्‍या २५ विद्यार्थ्यांना 'अमृत मेरिटोरियस' शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. संस्थेच्या विश्‍वस्त शरयु देशमुख यांच्याउपस्थितीत ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ़ एम़ .ए़. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा़. ए.के.मिश्रा, रजिस्ट्रार प्रा़. विजय वाघे, डीन डॉ़. एम़.आर.वाकचौरे, प्रथम वर्ष समन्वयक प्रा़. व्ही़. वाय.पाटील व सर्व विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते़.

शिक्षण घेतांना आर्थिक आणि बौधिक स्वरुपात चालना मिळण्यासाठी प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश यांनी ‘अमृत मेरिटोरियस’ या शिष्यवृत्तीची सुरुवात केली़. एका सत्रामध्ये 9.5 च्या पुढे गुणांकनमिळालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरुपात प्रत्येक महिना एक हजार रुपये म्हणजेच एका सत्रात सहा हजार रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरुप असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितले़. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आ. डॉ़. सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले़