धरणातून पाणी सोडल्याने निसरेत कोयना हाउसफुल्ल


पाटण /प्रतिनिधी : पावसाळा, हिवाळा संपला आणि आता ऐन उन्हाळ्यात कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी पात्र भरभरून वाहत आहे. नदीवरील जलसिंचन योजनांसाठी पाणीसाठा आवश्यक असल्याने पाटबंधारे खात्याने निसरे बंधार्‍यात दारे टाकुन पाणी अडवण्यास सुरुवात केली असून पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केल्याचेे दिसून येत आहे.

पाटण तालुक्यातील कोयना नदी पात्रातील पाणी अडवण्यासाठी उन्हाळी हंगामाकरीता निसरे बंधार्‍यात लोखंडी दारे टाकून पाणी अडविण्यास सुरू केले आहे. हा बंधारा कोल्हापूर पध्दतीचा असून सन 1992 मध्ये बांधून पूर्ण झाला आहे. त्याची लांबी 260 व रुंदी दोन मीटर इतकी आहे. त्यामध्ये 70 गाळे आहेत. पाणी साठवण क्षमता 155 दशलक्ष घनमीटर आहे. निसरे ते त्रिपुडीदरम्यान भिजणारे क्षेत्र 4100 एकर असून हा निसरे बंधारा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. महाराष्ट्राच्या अनेक विभागात दुष्काळाने लोक हैराण झाले पण पाटणचा कोयनाकाठ मात्र या बंधार्‍यामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. बारमाही पाणीसाठा असणारा हा बंधारा असून कोयनाकाठ सध्या समृध्द व निसर्गसौंदर्यांत भर घालणारा ठरत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget