Breaking News

बस वाहकाची प्रवाशांशी गैरवर्तवणूक.


राजूर/प्रतिनिधी: इगतपुरी आगाराच्या इगतपुरी-पुणे या बसच्या वाहकाने शेजारील सीटवर बसण्याच्या कारणावरून गैरवर्तणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रवाशाने अनिल नवगिर या वाहकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याबाबत माहिती अशी: इगतपुरी-पुणे धावणाऱ्या बसमध्ये बरीचशी गर्दी असल्याकारणाने प्रवाशी वाहकाच्या सीट शेजारील रिकाम्या जागेत बसले. परंतु या ठिकाणी तुम्हाला बसता येणार नाही असे सांगत आमचे साहेब येणार आहेत असे कारण देत प्रवाशास शिवीगाळ व अरेरावीची भाषा वापरली.

यावेळी इतर प्रवाशांनी या घटनेचा निषेध नोंदवला. या घटनेनंतर प्रवाशाने वाहकाविरुद्ध राजूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

प्रवाशांशी होणारी गैरवर्तणूक, बेदकारपणे वाहने चालवणे आदी गोष्टींमध्ये वाढ होतानाचे चित्र आहे. याबाबत आगर प्रमुखही काही कारवाई करताना दिसत नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.यावर आगार प्रमुखांनी कारवाई करावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा प्रवाश्यांची दिला आहे.