Breaking News

मॅक्सवेलच्या झंझावाताने ऑस्ट्रेलियाची भारतावर मात


बंगळुरू: ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावती खेळीच्या जीवावर ऑस्ट्रेलियाने भारतावर एकहाती विजय मिळविला. या विजयाबरोबगाराचं मालिकाही खिशात घातली.

भारताविरुद्धच्या दुसर्‍या टी- 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले 191 धावांचे मोठे लक्ष्य त्याच्या खेळीच्या जोरावरऑस्ट्रेलियाने 2 चेंडू राखून पार केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यांची टी 20 मालिका 2-0 अशी जिंकली. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणिमालिकावीर घोषित करण्यात आले.

191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. 11 चेंडूत 7 धावांची सावध खेळी करणारा मार्कस स्टॉयनीस त्रिफळाचीत झालाआणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्याने 1 चौकार लगावला. चांगल्या लयीत नसलेल्या कर्णधार फिंचला आजही अपयश आले. तो 8 धावांवर बाद झाला. त्याने केवळ 1 चौकार लगावला. जोरदार फटकेबाजी करणारा डार्सी शॉर्ट 40 धावांवर झेलबाद झाला. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात त्याने विजय शंकरला बळीदिला आणि ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. मात्र त्याने 40 धाव करत फटकेबाजी केली. त्यानंतर मॅक्सवेलने एकहाती डाव सांभाळला आणि फटकेबाजी करतशतक ठोकले. त्याने 7 चौकार आणि 9 षटकार ठोकत 55 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या. त्याला पीटरने 18 चेंडूत 20 धावा करून चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्‍या राहुलचे अर्धशतक दुसर्‍या सामन्यातहुकले. तो 26 चेंडूत 47 धावांची फटकेबाज खेळी करून बाद झाला. रोहितच्या जागी संधी मिळालेल्या शिखर धवनने सुरुवात चांगली केली मात्र तो 24 चेंडूत 14 धावा करून झेलबाद झाला. पहिल्या सामन्यात धावबाद झालेल्या ऋषभ पंतने या सामन्यात फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात अपयश आले. 6 चेंडूत 1 धाव करून तो झेलबाद झाला. पण त्यानंतर कोळी आणि धोनीने डाव सावरत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. 3 चेंडूत 3 षटकार मारून कोहलीनेफटकेबाजीची सुरुवात केली. त्यानंतर 1 धाव काढत त्याने आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. त्याने 30 चेंडूत अर्धशतक झळकावले. धोनीनेही त्याच्या सुरातसूर मिसळून तडाखेबाज खेळी केली. शेवटच्या षटकात धोनी 23 चेंडूत 40 धावा फटकावून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावला. दिनेशकार्तिकनेही शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 चौकार हाणले. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत कोहलीने भारताला 190 धावांपर्यंत पोहोचवले. कोहलीने नाबाद 72 धावाकेल्या. केवळ 38 चेंडूत त्याने 6 षटकार आणि 2 चौकार मारून तुफानी खेळी केली.