Breaking News

काँग्रेसच्या रिक्त शहर जिल्हाध्यक्षपदी भुजबळ यांची निवड करण्याची मागणी


अहमदनगर/प्रतिनिधी: पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत असणारे बाळासाहेब भुजबळ यांची रिक्त शहर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करावी. या मागणीसाठी शहरातील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पक्षाचे राष्ट्रीय सचिव व राज्याचे समन्वयक डॉ.वामशीचंद रेड्डी यांच्याशी चर्चा केली. 

रेड्डी हे नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले असून, नगरमध्ये काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर झालेल्या बैठकीनंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सदर मागणी केली.
यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे, अल्पसंख्याक विभागाचे फिरोज खान, भिंगार महिला अध्यक्षा मार्गरेट जाधव, श्याम वागस्कर, दानिश शेख, अज्जू शेख, दिलीप सकट, सुनिता बागडे, अरुण धामणे, रवी सूर्यवंशी, भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष आर.आर. पिल्ले, अभिजीत कांबळे, मयूर पाटोळे, केशवराव मुर्तडक, रिजवान शेख, हनीफ शेख, दानिश शेख, अझर शेख, फजल शेख, मुकुंद लखपती, रंजनी ताठे, जायदा शेख, शाहूराजे शर्मा, एम.आय. शेख, विवेक शेट्टी, फर्मान मोहंमद, मनोज सत्रे, शारदा वाघमारे आदि उपस्थित होते.
डॉ.सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेच्या दोन्ही जागेवर आघाडीचे उमेदवार निवडून आनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची ताकद भुजबळ यांच्या नेतृत्वामुळे दिसणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. त्यांच्या निवडीसाठी शहर जिल्हा ब्लॉक कमिटी, यूथ काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहमती दर्शवली आहे.