Breaking News

अजिंक्यतारा कारखान्यावर उद्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान


सातारा / प्रतिनिधी : सातारा जावलीचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमीत्त शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवार दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. या मैदानात सुमारे 100 कुस्त्या होणार असून या कुस्ती मैदानातील मल्लांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे डोळ्याचे पारणे ङ्गेडणार्‍या कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. 

या कुस्ती आखाड्यात पहिली कुस्ती पै. शिवाज राक्षे (महाबली केसरी) याची आणि पै. राजन तोमर (भारत केसरी) यांच्यात होणार आहे. दुसरी कुस्ती पै. समाधान पाटील (उपमहाराष्ट्र केसरी) आणि पै. अतुल पाटील (मुंबई महापौर केसरी) यांच्या होणार आहे. तिरसी कुस्ती पै. कौस्तुभ धापळे (उपमहाराष्ट्र केसरी) आणि पै. विलास डोईङ्गोडे (उपमहाराष्ट्र केसरी) यांच्यात होणार आहे. चौथी कुस्ती पै. विष्णू खोसे (नॅशनल चॅम्पियन) आणि पै. विजय धुमाळ (महाराष्ट्र चॅम्पियन) यांच्यात होणार आहे. पाचवी कुस्ती पै. संतोष दोरवड (उप महाराष्ट्र केसरीे) आणि पै. पोपट घोडके ((महाराष्ट्र चॅम्पियन) यांच्या होणार आहे. सहावी कुस्ती पै. निलेश लोखंडे (हिंदू गर्जना केसरी) आणि पै. संतोष सुतार (महाराष्ट्र चॅम्पियन) यांच्यात, सातवी कुस्ती पै. सोनू (महान भारत केसरी) आणि पै. पांडूरंग मांडवे (महाराष्ट्र चॅम्पियन), आठवी कुस्ती पै. राजेंद्र सुळ (हिंदकेसरी चॅम्पियन) आणि पै. सोम वीर (महाराष्ट्र चॅम्पियन) यांच्यात तर, नववी कुस्ती पै. गणेश चव्हाण आणि पै. दिपक पाटील यांच्यात होणार आहे. याशिवाय अनेक नामवंत मल्लांच्या 62 कुस्त्या आणि लहान वयोगटातील मल्लांच्या कुस्त्यांचे खास आकर्षण असणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून इंटरनॅशनल कोच पै. उत्तमराव पाटील, दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त पै. दिनकरराव सुर्यवंशी, एनआयएस प्रशिक्षक पै. दिलीप पवार, इंटरनॅशनल कोच पै. गोविंद पवार, उपमहाराष्ट्र केसरी पै. साहेबराव जाधव, पै. बलभिम भोसले, कुस्ती कोच दुर्योधन ननावरे, महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटक पै. नंदकुमार विभुते, सेनादलाचे एनआयएस कोच कुलवंत सिंह, पै. हणमंतराव गायकवाड, सुभेदार पै. आत्माराम पिसाळ राजेंद्र शिंदे, विष्णू शेठ, सामनाथ मरगड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समालोचक म्हणून शंकर पुजारी तर, हलगी वादक विशाल कांबळे (इचलकरंजी) यांचेही यावेळी आकर्षण राहणार आहे. 

या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पै. रामभाऊ जगदाळे, रविंद्र कदम, राजू भोसले, दिलीप निंबाळकर, हणमंतराव कणसे (गुरुजी), पै. उत्तमराव नावडकर, चंद्रकांत घोरपडे, पांडूरंग कणसे, पै. कांता जाधव, पै. राजाराम जाधव, नामदेव सावंत, पै. जितेंद्र कणसे, देवानंत पिसाळ यांनी केले आहे.