Breaking News

मुख्यमंत्र्यांचे पत्र न आल्याने प्रकल्पग्रस्तांत संताप


कोयनानगर /प्रतिनिधी : समन्यायी विकास, सर्वांचा विकास या सूत्रानुसार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्त जनता गेले 25 दिवस आपल्या न्यायिक हक्कासाठी कोयनानगर येथे ठिय्या आंदोलनास बसले आहेत. त्यामध्ये महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकीचे निश्र्चित तारखेचे लेखी पत्र अजूनही न आल्याने कोयना प्रकल्पग्रस्त जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

आज 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त शुक्रवारी आंदोलनाच्या 25 व्या दिवशी प्रकल्पग्रस्त महिलांनी व्यासपीठाचा ताबा घेत दिवसभर सरकारवर ताशेरे ओढले. कोयनानगर (ता. पाटण) येथे कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसर्‍या टप्प्यातील बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून मुख्यमंत्र्यां सोबत निश्र्चित तारखेच लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा आज महिला दिनानिमित्त बोलताना प्रकल्पग्रस्त महिला भगिनींनी दिला आहे.