Breaking News

प्रवरेच्या विद्यर्थिनीची मेघालय येथील प्रशिक्षणासाठी निवड


प्रवरानगर/प्रतिनिधी: प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षाची कु.पत्तीपाती झान्सी हिची मेघालय इथे होणाऱ्या उन्हाळी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्यासंशोधन फेलोशिप योजनेंतर्गत मेघालयातील नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटी शिलॉंग येथे हे संशोधन प्रशिक्षण होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली. या प्रशिक्षणासाठीझान्सीला प्रतिमाह १० हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक अँड बायोइन्फोचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.रामाराव सत्यवाडा यांचे तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महानिर्देशक डॉ. यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे आणिइतर शिक्षकांनी अभिनंदन केले.