Breaking News

मगोपतून भाजपत गेलेल्या आजगावकरांना उपमुख्यमंत्रिपद


पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना गोव्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांना वाहतूक खातेही दिले जाणार आहे. त्यांच्यासह भाजपत दाखल झालेले आणखी एक मगोचे आमदार दीपक पाऊसकर यांना सार्वजनिक बांधकाम हे महत्वाचे खाते दिली जाणार असल्याचे समजते.

राज्यात बुधवारी पहाटे दोन वाजता घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये मगोपचे आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मगोपचे नेते, उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यांच्या जागी आता आजगावकर यांनी संधी देण्यात आली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्यासह आता आजगावकर हे देखील गोव्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.