खूप झाले, आता सहन करणार नाही - मोदी


नवीदिल्लीः दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदी यांनी करून दिली आहे. 

‘सीआयएसएफ’च्या 50 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. मोदी यांनी ‘सीआयएसएफ’चे कौतुक केले. वैभवशाली भारताच्या निर्माणात आपले अमूल्य योगदान आहे. यात महिलांचेही महत्त्वाचे स्थान आहे. गणवेश परिधान केलेल्या मुलीची संख्या सीआयएसएफमध्ये खूप मोठी आहे. त्यामुळे या मुलीसोबत मी त्यांच्या आईचेही अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. गाझियाबादमधील सीआयएसफ कॅम्पमधील जवानांना संबोधित करताना मोदी म्हणाले, की तुमच्या हातात देशाची सुरक्षा आहे. कोणत्याही व्हीआयपीला सुरक्षा देण्यापेक्षाही तुमचे काम मोठे आहे. तुम्ही तुमचे काम किती नम्रपणे करतात याचा मी साक्षीदार आहे. 

तुमचे काम खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी देशात संकट आले, त्या वेळी सीआयएसएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून त्यांना मदत केली. नेपाळ आणि हैतीमध्ये झालेल्या भूकंपात आपण केलेल्या मदतीची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती. एखादे शेजारी राष्ट्र लढण्यास सक्षम नसेल, तर तो देशातील सुरक्षेला नुकसान पोहोचवण्याचे काम करतो. तो म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे, असे म्हणत मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला टोला लगावला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget