Breaking News

‘मॅझीक माऊंटन’ अ‍ॅम्युझमेंट पार्क पर्यटकांसाठी वरदान ठरेल - श्री.श्री.रवीशंकर


संगमनेर/प्रतिनिधी: निखळ मनोरंजनासह, आनंद आणि प्रसन्नता देणारी स्थळे ही जगण्यासाठी उत्साह आणि उर्जा देणारी एक प्रकारची मंदिरेच आहेत. मालपाणी गृपने कल्पकतेने साकारलेले अ‍ॅम्युझमेंट पार्कम्हणजे असेच आनंददायी मंदीर असून ते पर्यटकांसाठी वरदान ठरेल. पर्वतांच्या सान्निध्यातील ही खरीखुरी ‘मॅजिक’ आहे. इथे भेट देणे म्हणजे आनंदाची यात्रा घडणे आहे असे उद्गार आर्टऑफ लिव्हिंगचे प्रणेते, आध्यात्मिक गुरु श्री.श्री.रवीशंकर यांनी व्यक्त केले.

मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने लोणावळा येथे उभारण्यात आलेल्या मॅजिक माउंटन या अत्याधुनिक अ‍ॅम्युझमेंट पार्कचे सोमवारी दि. ११ रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी तेबोलत होते. यावेळी व्यासपीठावर भानुमती निरसिम्हा, खासदार श्रीरंग बारणे, माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, ललितादेवी मालपाणी, सुवर्णा मालपाणी यांचेसह मालपाणीपरिवारातील राजेश, डॉ संजय, मनीष, गिरीश, आशीष, जय, यशोवर्धन, हर्षवर्धन उपस्थित होते.

मानसिक तणाव आणि त्यातून येणारे वैफल्य, नैराश्य ही समस्या जगाला भेडसावत आहे. अशावेळी आनंद आणि प्रसन्नता देणारी अ‍ॅम्युझमेंट पार्कसारखी अनोखी स्थळे मनःशांती लाभलेलासृजनशील समाज घडवतील. स्वतः आनंदी रहाणे आणि इतरांना आनंद देणे ही ईश्वराची पूजाच आहे. मालपाणी समूहाने भविष्यात देशात विशेषतः ईशान्य पूर्व भारतात अशी पार्कस् बनवूनआनंदी समाजनिर्मितीत आपले योगदान द्यावे असे श्री.श्री.यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय व गिरीश मालपाणी यांनी तर आभारप्रदर्शन आशीष मालपाणी यांनी केले.