ट्रक व इर्टीका कार अपघातात चार ठार, चार गंभीर जखमी
नगर जामखेड रोडवर भीषण अपघात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची मोलाची मदत
जामखेड ता. प्रतिनिधी समीर शेख

जामखेड- नगर रोडवरील जामखेड पासुन दहा की मी आंतरावरील पोखरी फटा, या ठिकाणी आज दि १७ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रक व इर्टीका कार यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात आई व मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.


नागेश चमकुरे (इर्टीका ड्रायव्हर) वय ४०, योगेश चमकुरे वय २९, अनुजा चमकुरे (आई) वय ४३ वर्षे, अनिकेत चमकुरे (मुलगा) वय ७ वर्षे, सर्व रहाणार सावरगाव (पिरजादे, )ता मुखेड, जिल्हा नांदेड अशा एकाच कुटुंबातील दोन पुरुष, एक महीला व एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर जखमी मध्ये शंकर खुशाल चमकुरे वय ३७, खुशाल महादेव
चमकुरे वय ५८,सौ सुशिला खुशाल चमकुरे वय ५२, अरोही शंकर चमकुरे वय १० वर्षे हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की चमकुरे कुटुंब हे आपल्या नांदेड जिल्ह्य़ातील सावरगाव पिरजादे येथुन आपले वडील नोकरी निमित्त गुजरात राज्यातील उमरगाव या ठिकाणी आसलेल्या गावी सोडवण्यासाठी इर्टीका कार क्रमांक जी.जे.१५ सी.डी.६०८१ या गाडीने रात्रीच्या सुमारास चालले होते. त्यांची गाडी पहाटे जामखेड पासुन बारा कमी आंतरावरील नगर जामखेड रोडवर पोखरी फटा, ता. आष्टी. जिल्हा बीड या ठिकाणी आली आसता समोरुन येणाऱ्या ए.पी ३९ यु. २४२७ या ट्रकची समोरा समोर धडक झाली. व या भीषण अपघातात वरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.अपघात एवढा भीषण होता की इर्टीका कार चा ड्रायव्हर स्टेअरिंग व सीट च्या मध्ये अडकल्याने त्याचा मृतदेह काढण्यासाठी दिड तास लागला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी गेले व जखमींना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मयतांवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी त्यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, नगर सेवक शामेर सय्यद, शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय काशिद,पप्पू साळुंखे, जितेंद्र जाधव, दत्ता पवार, भैय्या खेत्रे, कय्युम कुरेशी, गुरफान कुरेशी मिठुलाल नवलाखा, विकास लगडे, लिंगायत समाज्याचे अध्यक्ष शिवकुमार डोंगरे व अमोल लोहकरे यांच्या सह शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांनी मदत केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget