Breaking News

देऊळगावराजा हायस्कूल देऊळगावराजामध्ये महिला दिन उत्साहात साजरा

(प्रतिनिधी): 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगात जागतिक महिला
दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत देऊळगावराजा हायस्कूल
देऊळगावराजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांच्या
सन्मानार्थ शाळेचे प्राचार्य एम.आर.थोरवे व पर्यवेक्षक डी.ए.खांडेभराड
यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.राजश्री गीते, सुषमा
राऊत, अ‍ॅड. सूनगत, तलाठी सरिता जायभाये, पोहेकॉ रेखाताई अंभोरे,
ग्रामसेविका सुषमा चेके, आरोग्य पर्यवेक्षिका मार्था कांबळे, कृषी सेविका
कविता गव्हाणे, एस.टी.वाहक रेखाताई भागीले, आदर्श गृहिणी मनीषा म्हस्के
आदी महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पत्रकार सुषमा राऊत यांनी महिला ह्या सबला तथा अष्टपैलू
कर्तृत्वाच्या धनी असून राष्ट्र विकासात मोलाची भूमिका पार पाडत असल्याचे
प्रतिपादन केले. तर डॉ.राजश्री गीते अ‍ॅड. सूनगत, सरिता जायभाये यांनीही
समयोचित मार्गदर्शन केले तथा विद्यार्थिनी कु.पुजा खार्डे हिने मनोगत
व्यक्त केले. कु. वैष्णवी भुतेकर स्वागत गीत व कु.भूमिका बंग हिने महिला
जीवनावर सुंदर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना
वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी स्त्री सृष्टीचा मूलाधार असून नारीशक्ती
शब्दातीत असल्याने स्त्री शक्तीचा सदैव आदर ठेवत तिला मानाचा मुजरा
असल्याचे सांगून मानव जातीचे वर्तुळ पूर्ण होण्यास स्त्री आणि पुरुष
दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन केले. पर्यवेक्षक
आर.बी.कोल्हे यांनी स्त्री जीवन हे त्यागमय वात्सल्यमय आणि संघर्षशील
असल्याचे आपल्या सुरेल गीतामधून विशद करत श्रोत्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलका खोंद्रे होत्या. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन गणेश मुंडे, प्रास्ताविक कु.सोनपरी दंदाले हिने केले तर आभार
कु.सानिका वाणी हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास गुरव,
व्ही.एन.खलसे चंदनपाठ, संतोष मोरे, प्रेमचंद राठोड, शाळेचा सांस्कृतिक
विभाग, शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.