Breaking News

भेंडे येथे धर्मध्वजारोहण सोहळा


भेंडे/प्रतिनिधी: नेवासे तालुक्यातील भेंड्याचे दक्षिणमुखी हनुमान विजयाचे प्रतिक आहे. असे प्रतिपादन श्रीराम साधना आश्रमाचे मंहत सुनिलगिरी महाराज यांनी केले. श्री क्षेत्र भेंडे येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे होणार्‍या हनुमान जयंती निमित्ताने हनुमान कथेच्या धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. 

यावेळी आ. बाळासाहेब मुरकुटे, नागेबाबा देवस्थाचे अंकुश महाराज कादे, तुकाराम मिसाळ, कशिनाथ नवले, ज्ञानेश्‍वरचे संचालक अशोक मिसाळ, नवले, गणेश गव्हाणे, गोरे महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सुनिलगिरी महाराज पुढे बोलताना म्हणाले की, धर्माचे कार्य करताना धर्मध्वजारोहण म्हत्वाचे मानले जाते. कर्म हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. दक्षिणमुखी हनुमान विजताचे प्रतिक आहे. जे हनुमान मंदिर दक्षिण दिशेला आहे. ते सर्व विजयाचे प्रतिक आहे. कलयुगमध्ये कलंकित अवतार होणार आहे. सदगुरु आणि नाम ज्यांच्याकडे त्यांना भगवंत तारणार, हनुमानजींचे नामस्मरण केल्याने आनंद मिळतो. कर्म करताना फळांची अपेक्षा न ठेवता कर्म केले गेले पाहिजे. माणसाने जीवनात सतकर्म करावे दान केल्याने धन मिळते तर ध्यान केल्याने ज्ञान मिळते. जीवनात या दोन गोष्टीला म्हत्वाचे स्थान दिले जाते. येणार्‍या या सप्ताह काळातील हनुमान कथेचा सर्वांनी आनंद घ्यावा. असे आवाहन मंहत सुनिलगिरी महाराज यांनी केले.

 या धर्मध्वजारोहण कार्यक्रमाला गुलाबराव आढागळे, अंबादास गोंडे, बापुसाहेब नजन, डॉ.लहानु मिसाळ, दादासाहेब गजरे, कल्याण मडके, अर्जुन शिंदे, सुनिल देशमुख, विश्‍वास कोकणे, संभाजी मिसाळ, किशोर सुकाळकर, नवथर, हेमंत कुलकर्णी, बंडु अंदुरे, चांगदेव जगताप, बाळासाहेब लिंगायत, घोडेगाव बसस्थानक वाहतूक नियत्रंक पिटेकर आदी यावेळी उपस्थित होते.