Breaking News

कॅथोलीक शाळेत डिजिटल क्लासरूम


टिळकनगर/वार्ताहर:श्रीरामपूर तालुक्यातील कॅथोलीक मराठी शाळेत प्रजाजागृती शिक्षण संस्थेचे सचिव फा. राजेंद्र लोंढे यांच्या हस्ते नुकतेच डिझिटल क्लासरूमचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचेसंचालक फा. मायकल वाघमारे होते.याप्रसंगी फा. लोंढे म्हणाले, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे असून, शिक्षण क्षेत्रात पारंपरिक अध्यपना ऐवजी शिक्षकांनी नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचे उपयोग करूनअध्यापन करावे. विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर करून शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित करून शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावे. छाया निकाळे यांनी स्वखर्चातूनडिझिटल वर्ग तयार केला आहे. प्रास्तविक मुख्याध्यापक पी. एस. निकम यांनी केले.

याप्रसंगी अगाथा सूर्यवंशी, छाया निकाळे, विना बोधक, शामल साळवे, भारती उबाळे, वैशाली बनसोडे, सुनील पंडित, प्रकाश निकाळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते