Breaking News

सातारा-महाबळेश्र्वर रस्त्यावर कागदपत्रे हरवल्याची तक्रार


 सातारा / प्रतिनिधी : मेढामार्गे सातार्‍याहून महाबळेश्र्वरकडे दुचाकीने प्रवास करताना शिरवली (ता. महाबळेश्वर) येथील अनिरूध्द वीर यांची विविध प्रकारची महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग अनावधानाने वाटेत कोठेतरी पडली आहेत. या बॅगेतील सर्व कागदपत्रे महत्वपूर्ण असल्याने वीर कुटूंबियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

त्यामुळे अनिरूध्द वीर यांची कागदपत्रे असलेली बॅग कोणास सापडली असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुचाकीस ही बॅग अडकवली होती. सातारा महाबळेश्वर प्रवासादरम्यान कोठेतरी ती बॅग अनावधानाने हरवली. बँकेची पासबुक्स, चेकबुक, शैक्षणिक व कौटुंबिक महत्वाची कागदपत्रेअसलेली ही बॅग कोणास सापडल्यास त्यांनी 7588864488 किंवा 9422608899 या मोबाईलवर संपर्क साधावा.