Breaking News

स्व सखाराम बाळा आगळे सेवा भावी संस्थेचे कार्य उल्लेखनीय - आ. मुरकुटे


भेंडे/प्रतिनिधी: नेवासे तालुक्यातील शिरसगाव येथील स्व.सखाराम आगळे सेवाभावी संस्थेचे कार्य उल्लेखनीय कामगिरी करत असून संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना व दिनदुबळ्यांना व कुपोषण झालेल्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदरची संस्था काम करत आहे. ग्रामीण भागातील या संस्थेची भरभराट आतीशय उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादण आ. मुरकुटे यांनी केले.

आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते खडका फाटा येथील शुचित्व सामाजिक संस्था खडका या संस्थेच्यावतीने सन 2019 सालच्या उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिलगीरी महाराज हे होते.

दीपक आगळे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी आ.बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, जि.प.सदस्य दत्तात्रय काळे, आबांदास कोरडे, शुचित्व संस्थेचे अध्यक्ष, कानिफनाथ सावंत, यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्व सखाराम बाळा पाटील आगळे सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये बाल भवन सुरु करून लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. यासाठी आरध्या बालभवनाची सुरवात केली. तसेच संस्थेच्या माध्यमातून विद्यालय, शाळा, सार्वजनिक ग्रंथालय यांना लाखो किमतीचे पुस्तके संस्थेच्या वतीने भेट दिली. 

तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून दिली. पुढे देखील दिली जाणार आहे. कुपोषित बालक यांना मुंख्य प्रवाहात आणन्यासाठी संस्था प्रामुख्याने हे अभियान संस्था राबवत आहे. असे उद्दिष्ट स्व सखाराम बाळा पाटील आगळे सेवा भावी संस्थेचे आहेत.