Breaking News

तरुणीची छेडछाडपाथर्डी (प्रतिनिधी)
अभिजीत खंडागळे

तालुक्यातील खांडगाव येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीची गणेश रमेश जोशी (रा. निवडुंगे,ता.पाथर्डी) याने जुने बस स्थानक येथे मला तू आवडतेस,माझ्या कडे रागाने पाहू नको असे म्हणत डोळा मारून तसेच हात धरत लज्जा उत्त्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे विद्यार्थ्यांनीच्या फिर्यादिवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गणेश रमेश जोशी यांच्याविरुद्ध छेडछाडीचा व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ प्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर छेडछाड करणाऱ्या गणेश जोशी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी तसेच बसस्थानक येथे पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात यावे यासाठी मंगळवारी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे,गणेश दिनकर,आनंद पवळे,आकाश काळोखे,शशिकांत वाघमारे,मुरलीधर दिनकर आदी जण उपस्थित होते..

याबाबत अधिक माहिती अशी की,पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,तालुक्यातील खांडगाव येथील विद्यार्थ्यांनी बाबुजी आव्हाड येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत असुन नेहमीप्रमाणे सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्यासाठी जुने बसस्थानक येथे खुर्चीवर बसुन बसची वाट पाहत असताना.एक अनोळखी इसम दुचाकीवरून येऊन त्या विद्यार्थ्यांनीच्या शेजारील खुर्चीवर बसला असता ती विद्यार्थ्यांनी तिथुन उठून दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.त्यावेळी तो इसम तुला कुठे जायचे,तुला मी नेऊन सोडतो असे म्हणत पुन्हा तिच्याजवळील खुर्चीवर येऊन तिला डोळा मारत,तिच्या हातास धरून मला तू आवडतेस,माझ्याकडे रागाने पाहू नकोस असे म्हणत लज्जा उत्त्पन्न होईल असे कृत्य त्याने केले.त्यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला असता तेथील लोकांनी त्यास धरून ठेवत पोलिसाच्या ताब्यात दिले.त्यांनंतर त्यांच्या नाव व गावाची चौकशी केली तेव्हा त्याने गणेश रमेश जोशी असे सांगितले.त्यावरून गणेश जोशी विरुध्द पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये छेडछाडीचा व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.