Breaking News

बिबट्याच्या हल्यात विदयार्थी जखमी


देवळाली प्रवरा / प्रतिनिधी: गुहा परिसरात असलेल्या कोळसे मळ्यात सोमवारी सायंकाळी दोन बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला करत सर्वांचा थरकाप उडवला. यावेळी २० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येत या बिबट्यानं दगड व काठीच्या साहाय्याने प्रतिबंध केला. यामुळे घाबरलेल्या बिबट्यांनी धूम ठोकली. या हल्ल्यात अभिजीत कोळसे हा महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाला.

याबाबत माहिती अशी: सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मक्याच्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी बिबट्याला पहिल्यांनंतर याची माहिती त्यांनी अभिजित कोळसे याला दिली. कोयता घेऊन अभिजित तेथे गेला असता तेथील दोन बिबट्यांनी अभिजितच्या पाठीवर व हातावर नखांनी जखमा केल्या. त्यावेळी महिलांनी आरडाओरड सुरू केली.महिलांच्या आवाजामुळे परिसरात असलेले २० ते २५ शेतकरी हातात दगड व काठ्या घेऊन मकाच्या दिशेने धावले. बिबट्यावर प्रतिहल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून बिबट्यांनी धूम ठोकली.

जखमी अवस्थेत असलेल्या अभिजित कोळसे यास राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रूग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्व घटनेनंतर वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परंतु या कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिक संतप्त झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली.

वनखात्याचे दुर्लक्ष

शेतामध्ये बिबटे आहेत याची आणि झाल्या प्रकारची माहिती देऊनही वन खात्याचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी उशिराने तेथे पोहोचले. करावी न करता टाळाटाळीची उत्तरे दिली. या भागात पिंजरा बसवण्यात यावा.
- किरण कोळसे, शेतकरी.