Breaking News

बदलत्या मराठी भाषेचा गौरव बाळगणे गरजेचे : प्रा. कस्तुरे


सातारा, (प्रतिनिधी) : मराठी भाषा जगातील 70 हून अधिक देशात तसेच भारतातील प्रत्येक राज्यात बोलली जाते. काळानुरुप मराठी भाषेत शब्द, वाक्यरचना शैली आदींबाबत बदल झालेले आहेत. या बदलत्या मराठी भाषेचा प्रत्येक मराठी भाषिकांनी गौरव बाळगावा भाषेचे मराठी भाषेचा प्रत्येक मराठी भाषिकांनी गौरव बाळगावा भाषेचे संबर्धन व संशोधन करावे, असे मत श्रीमती मीनलबेन मेहता, कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. अनंता कस्तुरे यांनी व्यक्त केले.

सातारा येथील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वंदना नलवडे होत्या. यावेळी डॉ. एस.एम. शिकलगार, डॉ. केशव गोरे, प्रा. निलांगी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्या डॉ. वंदना नलवडे अध्यक्ष स्थानावरुन बोलताना म्हणाल्या मराठी ही जगात सर्वदूर पोहचली आहे. तिचा अभिमान व गौरव प्रत्येकाने बाळगला पाहिजे. विद्‌‌‌यार्थ्यांनी महाविद्‌‌‌यालयीन जीवनातच विविध कला कौशल्ये आत्मसात करुन जीवनाला आकार द्‌‌‌यावा व आवडीच्या क्षेत्रात करइर करावे. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. मराठी भाषा दिनानिमित्त छात्राध्यापकांनी महाविद्यालय परिसरात ग्रंथदिंडी काढली. लेझिमच्या विविध प्रकारांचे सादरीकरण केले. यानिमित्ताने छात्राध्यापकांनी सादर केलेल्या पोवाडा, लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांनी मनमुराद दाद दिली.

प्रास्ताविक निलांगी भोसले यांनी केले, पाहुण्यांचा परिचय पुनम पवार यांनी करुन दिला. सूत्रसंचालन कार्तिकी कणसे हिने केले. आभार ममता वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व छात्राध्यापक उपस्थित होते.