Breaking News

जामा मशिदीची वास्तू सामाजिक ऐक्याचे प्रतिक -विखे


लोणी / प्रतिनिधी: हिंदू मुस्लीम समाजाने एकत्रित येवून साकार केलेल्‍या जामा मशिदीची वास्तू सामाजिक ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रेरणादायी ठरेल असा विश्वास विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.
सोनगाव येथे हिंदू मुस्लीम समाज घटकांनी एकत्रित येऊन जामा मशिदची उभारणी केली. या प्रार्थना स्थळाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विखे यांच्या हस्तेकरण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनगावग्रामस्थ आणि मुस्लिम समाजाच्या वतीने विखे यांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना विखे म्हणाले की, सामाजिक एकोपा टिकवण्याची परंपरा सर्वच समाज घटकांनी राखली आहे. गावपातळीवर असणाऱ्या या एकोप्यामुळेच शिर्डीमतदारसंघ असेल किंवा प्रवरा परिसराचा सामाजिक चेहरा एकात्मतेच्या भूमिकेतून पहायला मिळत आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष सिराज तांबोळी, महंमद तांबोळी, कबीर तांबोळी, एजाज तांबोळी, पाराजी धनवट,मच्छिंद्र अंत्रे,सुभाष अंत्रे, बाळकृष्ण चोरमुंगे, जे.पी.जोर्वेकर, विश्वास कडू, बाळासाहेब दिघे, किरण दिघे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.