Breaking News

विज्ञान दिनानिमित्त आनंद महाविद्यालयात विविध स्पर्धा


पाथर्डी/प्रतिनिधी: तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाच्या आनंद महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सेमिनार स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, प्रोजेक्ट स्पर्धा, मिनी प्रोजेक्ट स्पर्धा, आँप्टीक्स फोटो स्पर्धा, हेल्दी फूड स्टॉल इ. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेचे पहिल्या तीन क्रंमाकास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

मराठी राजभाषा दिनास प्रमुख पाहुणे म्हणून झी मराठी हास्यसम्राट फेम मा.राजीव सुरवसे तर विज्ञान दिनास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बेहेरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रा. लक्ष्मण देशपांडे निर्मित ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचा काही भाग प्रज्वल नरवडे याने सादर केला. तसेच प्रा. सुरवसे यांनी साहित्याचे महत्त्व, साहित्यातील विनोदाचे महत्त्व व विनोदाचे जीवनातील महत्त्व विशद केले. त्यांनी सादर केलेल्य’ गुदगुदल्या’ या प्रयोगाने सर्व महाविद्यालय हास्यरसात न्हाऊन निघाले. विज्ञान दिनाच्या निमित्ताने डॉ बेहेरे यांनी विज्ञान व मानवी जीवन याची सांगड आपल्या भाषणातून विशद करताना त्यांनी शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या कार्याचा आढावा घेतला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषराव पवार होते. यावेळी डॉ. बथूवेल पगारे, डॉ. मुक्तार शेख, डॉ. जगन्नाथ बर्शिले, डॉ. संजय नरवडे, डॉ. घोरपडे, प्रा. वालूजंकर, प्रा. पानसे, प्रा.जगदाळे उपस्थित होते.