Breaking News

अंजली नृत्यालयाच्या स्नेहसंमेलनास प्रतिसादअहमदनगर / प्रतिनिधी : येथील अंजली नृत्यालय, निर्मलनगर शाखेच्या वतीने रावसाहेब पटवर्धन स्मारकात स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत येलूलकर, पवन नाईक आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलनात समृद्धी तांबे, प्राजक्ता देशमुख, मानसी वाघमारे, ईश्‍वरी बोरुडे, सायली मुंडे, मृणाल राशीनकर, वैष्णवी माने, डिंपल वाघमारे, रिया जोरवेकर, प्रसन्न काकडे, गौरी आव्हाड, सारिका रेळेकर, समिक्षा नरसाळे, संस्कृती मुंडलिक, श्रृती कल्हापुरे, श्रेया आल्हाट, प्रांजल पंदरकर यांनी प्रणम्य शिरसा देवम्, गणेश कौतुगम, पुष्पांजली या नृत्यातून आपली कला सादर केली.