Breaking News

तहसील कार्यालयात 'आदर्श आचारसंहिता' विषयी बैठक


राहाता/प्रतिनिधी: आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यासंदर्भात राहाता तहसील कार्यालय येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहिता बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर तसेच शिवसेना व मनसे इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गोविंद शिंदे यांनी सांगितले की शिर्डी लोकसभा निवडणूक ही चौथ्या टप्प्यात होणार आहे. त्या संदर्भात आवश्यक ती माहिती या बैठकीत त्यांनी दिली. लोकसभा निवडणूक मध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघा मध्ये एकूण संख्या २ लाख 53 हजार 96 इतकी मतदार आहे ,यामध्ये पुरुष मतदार 1 लाख ते 30 हजार 557 तर स्त्री मतदार संख्या १ लाख 23 हजार 537 आहे. मतदान केंद्र एकूण संख्या 270 आहे ,यामध्ये राहता तालुक्यात 205 तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यात 65 मतदान केंद्र आहे. 341 सैनिक व दिव्यांग 1006 मतदार आहे.यांच्यासाठी यावेळेस विशेष ॲप व वाहतुकीची सोय करण्यात आली आहे. यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचा वापर करणार आहे .अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.