Breaking News

भाजपा कोरेगाव तालुका अध्यक्षपदी सौ. उज्वला निकम यांची निवड


कोरेगाव / प्रतिनिधी : भाजपा महिला आघाडी कोरेगाव तालुका अध्यक्षपदी सौ. उज्वला निकम व विधान सभा महिला मोर्चा अध्यक्ष या पदी सौ. पद्मा भोसले यांची निवड करण्यात आली .
ग्रामीण भागात महिला उद्योगात सक्षम होणे करिता त्यानी विविध रोजगार प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. तसेच येथून पुढे महिला या उद्योगा मध्ये जास्त सक्षम होतील असे उपक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी नमूद केले.सौ.पद्मा भोसले या विविध सामाजिक संघटना मध्ये कार्यरत आहेत.
या प्रसंगी भाजपा नेते मा.महेशदादा शिंदे यांनी सत्कार करून पुढील वाटचाल करिता शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी झिल्ला अध्यक्षा सौ. कविता कचरे, डॉ. अरुणा ताई बर्गे, भाजपा नेते राहुल बर्गे , कोरेगाव शहर अध्यक्ष सौ.आरती देवरे, सौ.साधना बर्गे ,पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते .