‘जमात-ए-इस्लामी’चे आयएसआयशी संबंध उघड



नवी दिल्ली : सरकारकडून नुकत्याच बंदी घालण्यात आलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेचा जम्मू काश्मीर खोर्‍यातील तरुणांना देशविघातक कार्यात सक्रिय करणे, शस्त्र पुरवठा करण्यात हात असल्याचे गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले आहे. संघटनेचे पाकिस्तान आणि ‘आयएसआय’शी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. याआधी देखील या संघटनेवर जम्मू आणि काश्मीर सरकारकडून आणि केंद्राकडून बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, मेहबूबा मुक्ती यांनी या संघटनेवर बंदी घातल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेचा पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’शी संपर्क ठेवून आहे. या संघटनेने पाकिस्तानच्या आयएसआयशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. हुर्रियत काँन्फरन्समध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेचा प्रमुख सदस्य सैय्यद अली शाह जिलानी कार्यरत आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती देताना सांगितले, की या संस्थेने पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय यांच्याशी संपर्क साधत आहे. जेणेकरून ते कश्मिरी तरुणांना शस्त्रे पुरविण्यासाठी हा संपर्क आहे, तरुणांना भडकविण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देणे आणि आर्थिक पुरवठा करणे शक्य होईल, त्यासाठी ‘जमात ए इस्लामी’ काम करत असल्याचे पुढे आले आहे. त्याच्या नेत्याचे पाकिस्तानचे नवी दिल्लीस्थित उच्चायुक्ताशी संपर्क निर्माण झाले होते. त्यावरून ही संघटना देशाविरोधी कारवाई करताना दिसत होती. त्यामुळे या संघटनेवर बंदी घातलण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget