Breaking News

नामनिर्देशनपत्र छाननीमध्ये दोन उमेदवारी अर्ज नामंजूर


 बुलडाणा,(प्रतिनिधी): 05- बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज 27 मार्च 2019 रोजी 15 उमेदवारांनी 23 नामांकन दाखल केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये दोन उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. 

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेंद्र देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, तहसिलदार दिनेश गिते, उमेदवार, उमेदवारांचे सूचक,वकील व प्रतिनिधी उपस्थित होते. नामनिर्देशनपत्र छाननीमध्ये उद्धव ओंकार आटोळे (अपक्ष) व अनिल गुलाबराव वानखेडे (अपक्ष) यांचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यात आले. छाननीअंती 05-बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार आहेत. छाननीअंती असलेले उमेदवार : अ. अफीस अ. अजीज (बहुजन समाज पार्टी), प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना), डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रताप पंढरीनाथ पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), बळीराम भगवान सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी), अनंता दत्ता पुरी (अपक्ष), गजानन उत्तम शांताबाई (अपक्ष), दादाराव बन्सी गायकवाड (अपक्ष), दिनकर तुकाराम संबारे (अपक्ष), प्रविण श्रीराम मोरे (अपक्ष), वामनराव गणपतराव आखरे (अपक्ष), विकास प्रकाश नांदवे (अपक्ष), विजय बनवारीलाल मसानी (अपक्ष).