Breaking News

सोनाईत तरुणास जबर मारहाण


सोनई/प्रतिनिधी: सोनई राहुरी रोडवरील रिक्षा स्टॅण्ड येथे रात्री 10 च्या सुमारास माघील भांडणाच्या कारणावरून संतोष अशोक फुलारे रा.सोनई या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर म्हसू कुसळकर, सुरज अशोक कुसळकर, विकास विठ्ठल कुसळकर, बबलू ज्ञानदेव कुसळकर, सौरभ तान्हाजी कुसळकर रा.सोनई व विशाल ब्राम्हणे, (गाव माहीत नाही) यांच्या विरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष याला रात्री बेदम मारहाण करण्यात आली असून डोक्यावर, तोंडावर, पाठीवर, पोटावर, मोठ्या प्रमाणात शरीरावर टाके पडल्याने रक्त भांबाल अवस्थेत नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार करून शनिशिंगणापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संतोष फुलारे यांनी फिर्याद दाखल केली आहे

. 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, नुसार गुन्हा दाखल केला आहे. नुकताच नव्याने वैदिकीय आव्हालानुसार 307 वाढीव कलम लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान सर्वजण फरार झाल्याने पोलिसांना आरोपीं पकडण्यास अपयश आले आहे. अधिक तपास पी.एस.आय.चवळी व्ही.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.