कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मदन भोसले भाजपात दाखल


सातारा / प्रतिनिधी : कॉंग्रेसचे माजी आमदार आणि किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी शनिवारी कारखाना कार्यस्थळावर डिस्टिलरीच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.खंडाळा कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदन दादा आता जनतेचा आवाज ऐका अशी हाक दिली होती. ते व्हापासून मदन भोसले यांच्या भाजप प्रवेश बाबतच्या चर्चा रंगल्या. मात्र, यावर मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतली.

दरम्यानच्या काळात रणजितसिंग नाईक-निंबाळकर यांची कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कॉंग्रेस कमिटीत येथे झालेल्या बैठकीला मदनदादा यांनी गैरहजेरी लावली होती. तसेच लोणंद येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला त्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे मदन भोसले आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना जोर आला होता. किसनवीर कारखान्याच्या डिस्टिलरी उद्घाटन कार्यक्रमातच मधून दादा भाजपात प्रवेश करतील अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच मदनदादा भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ते भावी आमदार असल्याचे सूचक वक्तव्य केले.दरम्यान मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अगोदरच कॉंग्रेसची अवस्था जिल्ह्यात वाईट असताना मदन भोसले भाजपमध्ये गेल्यामुळे कॉंग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget