Breaking News

आनंद विद्यालयात शहाजीराजांना अभिवादन


अहमदनगर / प्रतिनिधी : गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे, मीनाक्षी वाघस्कर, मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, सीमा ढोकणे, सुनीता साप्ते, सपना रणखांब आदि उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका शारदा पोखरकर यांनी विद्यार्थ्यांना परिचित नसलेला शहाजीराजांचा इतिहास कार्यक्रमात मांडला.