Breaking News

मतदारसंघ सोडण्यासाठी विखेंकडून दोन्ही काँग्रेसवर दबावः दानवेनगर / प्रतिनिधीः
राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या कदाचित त्यांच्या पक्षासाठी दबावतंत्राचा भाग असावा. भाजपशी त्यांचा कोणताही संपर्क नाही किंवा भाजपचा नेताही त्यांच्या संपर्कात नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

दानवे म्हणाले, की विखेंचा अद्याप भाजपशी संपर्क झालेला नाही. यासंबंधीच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांच्या उमेदवारीसाठी दबाव आणत आहेत.