फेडररचे विजयाचे शतक


नवी दिल्ली/वृत्तसंस्था: दुबई टेनिस चँपियनशिप मध्ये पुरुष एकेरी टेनिस सामन्यात स्टिफेनोज सिर्सीपस याला हरवून टेनिसचा अनभिशिक्त सम्राट रॉजर फेडरर यांने पुरुष एकेरीतील १०० व्या विजयाची नोंद केली. ही कामगिरी करणारा तो दुसरा टेनिस पटू ठरला. अमेरिकेच्या जिमी कॉनर्स याने पुरुष एकेरी मध्ये १०९ वेळा विजय मिळविला आहे.

रॉजरचे टेनिस करिअर खऱ्या अर्थाने सुरु झाले ते २००१ पासून. त्याने २००५ पर्यंत ३३ खिताब जिंकले होते तर २००६ ते १० या काळातही ३३ विजेतेपदे मिळविली होती. २०११ ते १५ या काळात २२ तर २०१६ ते २०१९ या काळात ही संख्या १२ आहे. रॉजर ने हार्ड कोर्टवर सर्वाधिक म्हणजे ६९ वेळा विजय नोंदविला आहे तर ग्रास कोर्टवर १८, क्ले कोर्टवर ११ तर कार्पेट सरफेसवर २ विजेतेपदे मिळविली आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget