Breaking News

शासनाने ‘टीईटी’ संदर्भात अट शिथील करावी : बोडखे


अहमदनगर / प्रतिनिधी : येथील टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवांवर गडांतर येत असताना, त्यांचे वेतन रोखण्याचा प्रकार त्वरीत थांबवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याच्या मागणीचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना देण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शासनाने टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मार्च 2019 पर्यंत मुदत दिलेली होती. मार्च 2019 अगोदर टीईटी उत्तीर्ण नसलेले व सेवेत कायम झालेल्या किंवा अस्थायी शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमिक शाळा संहितेनुसार शिक्षकांच्या नियुक्त्या होतात. निलंबन, सेवासमाप्ती, शिक्षा याबाबत सर्व तरतुदी शाळा संहितेनुसार लागू आहे. त्यामुळे टीईटीच्या शासन निर्णयाविषयी कायदेशीर प्रश्‍न निर्माण झालेला असून शासनाने निर्गमित केलेली अट शिथील करावी, मार्चनंतर शिक्षकांचे वेतन थांबवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.