Breaking News

महिला कलावंताचा सहाव्या दिवशी उपोषण सुरू


जामखेड ता.प्रतिनीधी - जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कला केंद्र चालक व तेथील महिला व पुरूष कलाकारांनी दि.28 रोजी पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहाव्या दिवशी दोन महिला व तीन पुरष कलाकार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे त्या दोन महिला व तीन पुरूष वर उपचार सुरू आहे

महिला व पुरूष कलाकारांनी बीड रोड वरील नटराज कलाकेंद्रांच्या बाहेरच आमरण उपोषण सुरू केले आहे. आज दि. 5 मंगळवार उपोषणाचा सहावा दिवस असुन शासनाने अजून कायच दखल घेतली नाही मंगळ जाधव ,संजीवनी जाधव, या दोन महिला व संतोष काळे ,रवि कांबळे, राहुल राळेभात या तीन पुरूष कलाकारांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने आता मोहा परिसरातील कला केंद्रांचा विषय चांगलाच महाराष्ट्र भर चिघळला आहे. याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, या कडे महाराष्ट्रातील कला केंद्राचे लक्ष लागले आहे

आम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचे महाराष्ट्र भर आंदोलन राहतील

महिला कलावंत लहान लहान मुला समवेत उपोषणाला बसले आहे आमचा कोणालाच त्रास नसताना आमच्यावर काही लोकांनी मुद्दाहुन अन्याय केला आहे आम्ही कला सादर करूनच आम्ही आमचे लहान मुला बाळांसह पोट भरतो कलाकेंद्र शासनाने बंद केल्यावर आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असे काही महिला कलांवताच्या डोळयातुन आश्रु येऊन आमच्या लोकमथंन शी बोलताना व्यक्त केल्या आहे

सर्वच कलाकार न्याय मिळेपर्यन्त उपोषणास ठाम आहेत तसेच गेल्या तीस वर्षापासुन आमचा कोणाला त्रास नाही तसेच पुढेही आमचा त्रास होणार नाही आम्हा लोक कलावंताचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे कलाकेंद्र असुन ती जर बंद झाली तर सर्व कलाकारावर उपासमारीची वेळ येणार आहे तेंव्हा शासनानी सहानुभुतीपुर्वक विचार करून त्वरीत कला केंद्र चालु करण्यास परवानगी द्यावी का शासन एखादयाचा जिव गमावल्या नंतर न्याय देतो का काय असाही सवाल कलावंताना पडला आहे महिला कलावंत मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

महिला कलांवत बोलताना म्हणाल्या कि आम्हाला जो पर्यंत शासनाकडून न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही महिला व पुरूष कलावंत कोणीच उपोषण सोडणार नाही शासनाने आम्हाला कलाकेंद्र चालवण्याची परवानगी दिली परवानगी दिल्यानंतर आम्ही कलाकेंद्र चालू केले मग आमच्या वर शासनाने परत पाच कलाकेंद्रावरच का अन्याय केला असा सवाल आम्हाला पडला आहे महाराष्ट्रात सरकार ने संगीत बारी कला केंद्र यांना परवानगी दिली मग हया आमच्या जामखेड च्या गोरगरीब पाच कलाकेंद्रावरच का अन्याय झाला आहे जो पर्यंत कला केंद्र सुरू होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आमचा जिव गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटनार नाही असा ठाम निर्णय महिलांनी घेतला आहे दोन महिला व तीन पुरूष उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली