Breaking News

दरोड्याच्या तयारीत असलेले संशयित पोलिसांच्या जाळ्यात


संगमनेर/प्रतिनिधी

संगमनेर शहर परिसरात होणाऱ्या चोरी घरफोडीच्या तक्रारींचा छडा लावण्यासाठी शहरात पोलीस सध्या कंबर कसताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून आजदि. ८ रोजी रात्रीच्या गस्तीत शहर पोलिसांना दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात मोठे यश आले आहे. यात सहा संशयित आरोपी आणि धारदारशस्त्रांसह एक लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,काल (शुक्रवार)पहाटे पावणे तीनच्या सुमारास शहरातील तिरंगा चौक,मालदाड रस्ता भागात काही संशयित पोलिसांना रात्रीच्या गस्तीत आढळले. पोलीस समोर उभे असलेल्या सहा पैकी तीन आरोपींनी तेथून पळ काढला. परंतु उर्वरिततीन आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे दरोड्यासाठी लागणारे धारदार शस्त्रे, हत्यारे व तीन दुचाकी असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल आढळूनआला. आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पळून गेलेल्या तिघांना ताब्यात घेतले.

सचिन गोपीनाथ म्हस्कुले (वय-२८, रा.धांदरफळ ता.संगमनेर), विजय लखन तामचीकर (वय-२५ रा. एकलव्य वसाहत, ता. राहुरी), भीमा बाजीराव डोके (वय-२०रा.धांदरफळ ता.संगमनेर) , राहुल अशोक गुंजाळ (वय-१९, रा.निमज ता.संगमनेर), गणेश संभाजी पर्बत (वय-२४ रा.निंबाळे ता.संगमनेर), शेखर साहेबराव कातोरे(वय-२८, रा.सांगवी ता.संगमनेर) असे पकडण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. पोकॉ. सागर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनीसहाही आरोपींविरोधात गुन्हा रजि क्र. १५४/१९ भादंवि कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. न्यायालयानेआरोपींना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यातील बहुतांश आरोपी संगमनेर तालुक्यातील असल्यामुळे यामागील गुन्ह्यात आरोपींचा काही सहभागआहे का याचाही पोलीस शोध घेत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोनि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक पंकज निकम करीत आहे.