Breaking News

‘ज्ञानांकूर’चे विद्यापीठात रुपांतर व्हावे : कोठारी


अहमदनगर /प्रतिनिधी : “ज्ञानांकूर शाळेत योग्य पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे, त्यांचे चांगले संगोपन करण्याबरोबरच त्यांच्या मनात भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याची बीजे लहानवयातच रोवण्याचे काम केले जात असून सामाजिक भावना जपणार्‍या या शाळेचे भविष्यात विद्यापीठात रुपांतर व्हावे’’, असे प्रतिपादन मंगल भक्तसेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांनी केले.

शहरातील आनंदधाम जवळील ज्ञानांकूर नर्सरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण नुकतेच पार पडले. 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा. अंजली शिरसाठ, सुनील हारदे, सुनील आंधळे, रुपाली निमसे आदी उपस्थित होते. प्रास्तविक सुजाता आंधळे यांनी केले. सौरभ आंधळे यांनी आभार मानले.