Breaking News

एकलहरे जि.प.उर्दू, मराठी शाळेत स्नेहसंमेलन


टिळकनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालूक्यातील एकलहरे येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. स्नेहसंमेलन कार्यक्रम सूरू करन्याच्या अगोदर पूलवामा येथे आतंकवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या विर जवानांना श्रंध्दाजली अर्पण करन्यात आली. 

कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच नसिमखातून लालमोहमद जहागीरदार, ग्रामपंचायत सदस्य राजमोहमद पटेल, सौ वैशाली मकासरे यांच्या हस्ते करन्यात आले. स्नेहसंमेलन कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभाग घेतला होता. याप्रसंगी देशभक्ती गिते, हिंदी व मराठी गाण्यावर नृत्य, नाटक, लावन्या,विवीध आकर्षक नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विवीध गाण्यांवर आकर्षक नृत्य करीत उपस्थितांची मने जिंकली, दरम्यान उपस्थितांकडून विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव झाला.

याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती गायकवाड, उक्कलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शेलार, उक्कलगाव केंद्रशाळेचे केंद्रमुख्याध्यापक श्री.वडीतके, शिक्षक अनाप, बोरुडे, डागळे, अंत्रे, शिक्षिका शबाना शेख, शोभा शेंडगे. पिंजारी, इमाम शेख , यास्मिन शेख, नसीबा बाजी, मेहरूनिसा शेख, अकबर शेख, मूकबधिर शाळेचे शिक्षक साळुंके आदी प्रमूख पाहूण्यांची उपस्थिती होती.