Breaking News

स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी कर्तृत्वाची ताकद उभी करा- मुरकुटे


भेंडा/प्रतिनिधी
जीवनात खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी आपले कर्तव्य वेळेवर पार पाडण्याची तयारी महिलांनी ठेवावी. आज स्त्रिया या विविध क्षेत्रात कार्यरत व सर्वात पुढेदिसत आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये ही ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांनी स्वतः पुढे स्पर्धांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्त्री शक्तीच्याउद्धारासाठी कर्तृत्वाची ताकद उभी करण्याचा प्रयत्न महिलांनी करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा मुरकुटे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जयहरि महिला बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शनकरताना त्या बोलत होत्या. यावेळी संगिता बर्डे, प्रा.संतोष तागड, पंचगंगा सिड्स कंपनीच्या संचालिका अनिता शिंदे ,नगरसेविका डॉ. निर्मला सांगळे,अनिताडोकडे, नीताताई वाघ, स्वरमाधुरी संगीत विद्यालयाच्या संचालिका माधुरी कुलकर्णी, सुमनबाई काळे, संजीवनी मुरकुटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.फुलारी वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्याद्वारेसादर केले.यावेळी उपस्थितांचे संजीवनी मुरकुटे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाताजिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांची मोफत हिमोग्लोबिन वकॅल्शियम तपासणी करण्यात आली. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर संजीवनी मुरकुटे यांनी आभार मानले.