Breaking News

नान्नज ग्रामपंचायतमध्ये घंटागाडीचे उदघाटन


जामखेड / ता.प्रतिनीधी: तालुक्यातील नान्नज येथील ग्रामपंचायत मध्ये कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीची सुरवात करण्यात आली असून त्याचे भाजपचे जेष्ठ नेते रामसिंगपरदेशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर नान्नज मध्ये सरपंच विद्या मोहोळकर यांच्या प्रयत्नातून घंटागाडी योजनेचीसुरवात झाली आहे.

 गावातील प्रत्येक कुटुंबास कचरा साठवण्यासाठी एक कुंडी दिली जाणार आहे .नागरिकांनी तो कचरा जमा करून घंटागाडी मध्ये टाकावा वआपला परिसर स्वच्छ करावा असे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत आव्हान करण्यात आले आहे. यावेळी सरपंच विद्या मोहोळकर , भाजपचे नान्नज शहरअध्यक्ष डॉ.सर्जेराव मोहळकर, उपसरपंच तुळशीराम मोहोळकर , सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.